Pune To Jejuri Bus Timetable
पुणे ते जेजुरी हे अंतर साधारणपणे पन्नास किलोमीटरचे आहे . आणि बसचा प्रवास सुध्दा साधारणपणे एक ते दीड तासाचा आहे. पुणे शहरात जी मुख्य तीन बस डेपो आहेत स्वारगेट, पुणे रेल्वे बस स्टॅन्ड आणि शिवाजीनगर त्यापैकी जेजुरी ला जाणाऱ्या बऱ्यापैकी सर्वच बसेस या स्वारगेट वरून जातात. त्यामुळे जर तुम्ही स्वारगेट बस स्टँडला जाण्यास प्रेफरेन्स द्यायला हवा . स्वारगेट वरून जेजुरीला दिवसभरात जाणाऱ्या बसेस ची संख्या ब्याऐंशी इतकी आहे (८२).
स्वारगेट वरून जेजुरीला जाणारी पहिली बस हि सकाळी पहाटे ५:३० ला सांगोल्या साठी रवाना होते जी जेजुरी मार्गे सांगोल्याला जाते. आणि शेवटची बस हि रात्री अडीच (२:३०) वाजता बारामतीला जाणारी बस जेजुरीला थांबते.
जेजुरी मार्गे जाणाऱ्या आठ वेगवेगळ्या आगाराच्या बसेस आहेत. स्वारगेट ते बारामती जाणाऱ्या बारा बसेस ह्या सासवड जेजुरी मार्गे जातात. पहिली बस हि पहाटे सहा ६: ०० वाजता निघते आणि शेवटची बस बारामतीचा रात्रीच्या २:३० ला निघते. गाणगापूर ला जाणारी १८:४५ ची बस हि जेजुरी वरून कर्नाटकात जाते.
गोंदवलेला जाणाऱ्या अकरा बसेस ह्या जेजुरी वरून जातात पहिली बस हि सकाळी सव्वा सात ७:१५ ला सुटते आणि शेवटची बस हि रात्री साडे बाराला १२:३० ला स्वारगेट वरून सुटते. मंगळवेढ्याचा जाणाऱ्या एकवीस बसेस ह्या जेजुरी मार्गे जातात. पहिली बस हि पहाटे ६:३० ला स्वारगेट वरून सुटते आणि शेवटची बस हि रात्री साडे बारा ला सुटते.(१२:३०).
नीरा ला जाणाऱ्या पाच बसेस आहेत , त्यातील पहिली बस हि ७:१५ ला सुटते आणि शेवटची बस हि ९:०० वाजता सुटते. पंढरपूरला जाणाऱ्या बसेस हि जेजुरीवरून जातात.पहिली गाडी हि पहाटे पाच ला सुटते आणि शेवटची गाडी हि मध्यरात्री २:३० ला स्वारगेट वरून सुटते. फलटण ला स्वारगेट वरून अकरा गाड्या जातात त्यातील पहिली गाडी हि ९:१५ ला सुटते आणि शेवटची गाडी २२:०० ला सुटते.
सांगोल्याला जाणाऱ्या तेरा गाड्या ह्या जेजुरीवरून जातात त्यातील पहिली गाडी हि सकाळी ५:३० ला जाते आणि शेवटची गाडी हि रात्री २२:३० ला सुटते. वालचंदनगरला जाणाऱ्या तीन गाड्या सुद्धा जेजुरी मार्गे जातात. पहिली पहाटे ६:०० वाजता जाते आणि शेवटची २२:३० ला सुटते.
Pune To Jejuri Bus Timetable
Gangapur | 18:45 |
Nira | 07:15 08:15 08:30 08:45 09:00 |
Walchandnagar | 06:00 07:00 22:30 |
Baramati | 06:00 07:00 09:00 09:15 09:45 10:15 11:30 13:00 14:00 18:15 19:00 21:00 22:00 02:30 |
Gondwale | 07:15 09:45 11:30 12:00 12:30 13:00 13:30 14:15 15:15 16:30 00:30 |
Mangalvedha | 06:30 07:30 07:45 08:30 09:00 09:15 09:30 09:45 10:15 10:30 11:15 14:30 15:30 16:30 17:30 18:30 19:45 21:30 22:30 23:30 00:30 |
Sangola | 05:30 06:30 07:00 10:15 11:00 11:15 11:45 12:15 13:00 14:15 16:15 17:45 22:30 |
Phaltan | 09:15 09:45 11:00 12:00 12:15 13:15 13:30 14:45 16:15 20:30 22:00 |
आमच्या कडे शिवाजीनगर आणि पुणे रेल्वे स्टेशन बस स्टॅन्ड वरून जेजुरीला जाणाऱ्या बसेस ची माहिती नसल्यामुळे स्वारगेट वरून जेजुरीला जाणाऱ्या बसेस ची माहिती दिली . इंटरनेटवर पुण्यावरून जेजुरीला जाणाऱ्या बसेसची जितकी माहिती उपलब्ध होती ती आम्ही या पोस्ट मध्ये तुम्हाला सांगितली आहे . जर या पोस्ट मध्ये काही चूक असेल किंवा कोणती गोष्ट आम्ही सुधारू शकतो ते तुम्ही ती माहिती आम्हाला कंमेंट मध्ये किंवा इमेलद्वारे पाठवू शकता.
धन्यवाद माहिती दिल्याबद्द्ल