Pune To Shirdi Bus Timetable
पुणे ते शिर्डी हा प्रवास साधारणतः १८० ते १९० किलोमीटरचा आहे जो बस मधून चार ते पाच तासाचा आहे. पुण्यावरून शिर्डीला ७४ बसेस जातात ज्या शिवाजीनगर वाकडेवाडी बस स्टॅन्ड वरून शिर्डीसाठी रवाना होतात. या बसेस शिवाजीनगर वरून वेगवेगळ्या तेरा बस डेपो कडे जाण्यासाठी निघतात व त्या बसेस शिर्डीला एक स्टॉप घेतात.
शिर्डीला जाणारी पहिली गाडी हि शिवाजीनगरवरून पहाटे पाच वाजता निघते आणि शेवटची गाडी हि मध्यरात्री तीन वाजता मालेगाव साठी निघते. चोपडा ला जाणाऱ्या तीन गाड्या आहेत ज्यातील पहिली गाडी हि पहाटे ५:३० ला निघते आणि शेवटची गाडी हि १८:३० ला सुटते. धुळेला जाणाऱ्या एकूण बारा बसेस या शिर्डीवरून जातात, धुळेला जाणारी पहिली गाडी पहाटे ६:३० वाजता सुटते आणि शेवटची गाडी रात्री २२:३० ला सुटते.
अमळनेर ला एकूण पाच गाड्या जातात , पहिली गाडी हि पहाटे ५:४० ला सुटते आणि शेवटची गाडी हि संध्याकाळी १८:०० ला सुटते. मालेगाव ला तीन बसेस जातात पहिली सकाळी ९:३० वाजता आणि शेवटची रात्री ३:०० वाजता. कोपरगाव ला जाणाऱ्या गाड्यांची संख्या हि चौदा इतकी आहे. शिवाजीनगरवरून पहिली गाडी हि पहाटे ५:०० ला सुटते आणि शेवटची गाडी हि दुपारी १६:१५ ला सुटते.
मनमाडला जाणारी पहिली गाडी हि पहाटे ५:०० ला सुटते आणि शेवटची गाडी दुपारी १५:३० ला सुटते . मनमाडला एकूण पाच बसेस शिवाजीनगर वरून जातात. नंदुरबारला सहा बसेस जातात ज्या सर्वच शिर्डी मार्गे जातात , सर्वात पहिली बस हि पहाटे ५:०० वाजता सुटते आणि शेवटची बस हि रात्री २०:३० ला वाकडेवाडी वरून सुटते.
शिर्डी हा शेवटचा स्टॉप असणाऱ्या एकूण नऊ बसेस ह्या शिवाजीनगर बस स्टॅन्ड वरून जातात.त्यातील सर्वात पहिली बस हि साधारणपणे पहाटे ५:१५ ला सुटते आणि शेवटची बस हि रात्री २३:०० ला सुटते.
Pune To Shirdi Bus Timetable
Dondaicha | 06:00 19:00 |
Malegaon | 03:00 09:30 13:00 |
Chopda | 05:30 07:00 18:30 |
Amalner | 05:40 06:15 06:45 07:00 18:00 |
Shindkheda | 06:00 08:45 09:45 |
Shirpur | 07:45 09:30 21:00 |
Yeola | 06:00 13:00 14:00 15:00 16:45 |
Shahada | 07:15 08:00 09:30 20:30 |
Nandurbar | 05:00 07:00 11:00 13:30 15:30 |
Shivajinagar Pune to Shirdi | 05:15 06:15 08:30 09:00 09:30 12:45 19:30 23:00 |
Dhule | 06:00 06:45 08:30 09:00 10:30 10:45 12:45 13:00 15:15 16:15 19:00 22:30 |
Kopargaon | 05:00 06:30 07:15 08:00 11:30 11:30 12:30 13:15 13:30 14:00 16:00 16:15 |
Manmad | 05:00 05:30 07:00 18:30 19:00 20:30 |
आमच्या कडे स्वारगेट आणि पुणे रेल्वे स्टेशन बस स्टॅन्ड वरून शिर्डीला जाणाऱ्या बसेस ची माहिती नसल्यामुळे शिवाजीनगर वरून शिर्डीला जाणाऱ्या बसेस ची माहिती दिली . इंटरनेटवर पुण्यावरून शिर्डीला जाणाऱ्या बसेसची जितकी माहिती उपलब्ध होती ती आम्ही या पोस्ट मध्ये तुम्हाला सांगितली आहे . जर या पोस्ट मध्ये काही चूक असेल किंवा कोणती गोष्ट आम्ही सुधारू शकतो ते तुम्ही ती माहिती आम्हाला कंमेंट मध्ये किंवा इमेलद्वारे पाठवू शकता.