Ahmednagar To Pune ST Bus Timetable

Ahmednagar To Pune ST Bus Timetable

अहमदनगर वरून पुण्याला जाण्यासाठी एकूण नऊ डेपोच्या बसेस आहेत ज्या अहमदनगरच्या ताराकपूर बस स्टॅन्ड वरून पुण्याला जातात. ज्यातील बसेस ची संख्या हि साधारण पणे अठ्ठावीस बसेस आहेत . ज्या वेगवेगळ्या नऊ डेपोच्या आहेत पण त्या पुणे मार्गे जातात . आणि यातील बऱ्याच बसेस या शिवाजीनगरला जातात आणि ज्या कोल्हापूरला जातात त्या स्वारगेट बस डेपोला जातात.

कोल्हापूरला जाणाऱ्या चार बसेस आहेत ज्या पुणे मार्गे जातात आणि या चारहि बसेस या स्वारगेट बस स्टँडला जातात. पहिली बस हि सकाळी ०९:०० ला अहमदनगर वरून सुटते , दुसरी बस हि १०:१५ ला स्टॅन्ड वरून सुटते , तिसरी बस हि दुपारी १२:४५ ला नगर बस स्टॅन्ड वरून निघते आणि पुणे मार्गे कोल्हापूरला जाणारी शेवटची बस हि रात्री १९:३० ला नगर बस डेपोतून सुटते.

छत्रपती संभाजीनगर वरून येणाऱ्या अकरा बसेस या अहमदनगर मार्गे पुण्याला जातात ज्यातील पहिली बस हि सकाळी ०८:१५ ला अहमदनगर वरून सुटते आणि शेवटची बस हि रात्री ०१:१५ ला अहमदनगर वरून पुण्याला जाण्यासाठी सुटते. मुंबईला जाणाऱ्या चार बसेस आहेत पहिली बस हि सकाळी ०८:०० ला सुटते , शेवटची बस हि रात्री २३:१५ ला सुटते , आणि या दरम्यान ०९:३० आणि २२:४५ ला नागरवरून मुंबईला जाण्यासाठी रवाना होतात.

अलिबागला जाणारी एक बस आहे जी १०:३० वाजता नगरवरून सुटते आणि ती शिवाजीनगर मार्गे अलिबाग ला जाते . दापोलीला आणि महाबळेश्वरला जाणाऱ्या सुध्दा एक एक बसेस आहेत ज्या स्वारगेट मार्गे जातात दापोलीला जाणारी बस हि सकाळी ११:०० ला सुटते आणि महाबळेश्वरला जाणारी बस हि पहाटे ०६:३० ला सुटते.

महाडला जाणाऱ्या दोन बसेस आहेत पहिली बस हि दुपारी १२:४५ ला सुटते , आणि दुसरी बस १३:३० ला स्वारगेट ला जाण्यासाठी रवाना होते. रोहा आणि दादर ला जाण्यासाठी दोन दोन बसेस दिवसभरात आहेत. दादरला जाणारी पहिली बस हि सकाळी ०९:३० ला सुटते. आणि दुसरी बस हि संध्याकाळी १७:०० ला सुटते. रोह्याला जाणारी पहिली बस १०:४५ आणि दुसरी बस हि १२:३० ला नगर बस डेपोमधून निघते .

Ahmednagar To Pune ST Bus Timetable

Alibag10:30
Dapoli11:00
Mahabaleshwar06:30
Mahad12:45 13:30
Dadar09:30 17:00
Roha10:45 12:30
kolhapur09:00 10:15 12:45 19:30
Mumbai08:00 09:30 22:45 23:15
Pune08:15 08:45 09:15 09:45
10:15 10:45 11:15 11:45
12:15
Ahmednagar To Pune ST Bus Timetable (अहमदनगर ते पुणे)

वरील पोस्ट हि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून लिहिली आहे, पोस्ट मध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या कंमेंट्स मध्ये नक्की सांगा . जर तुमच्याकडे पुणे , अहमदनगर किंवा इतर कोणत्याही बस डेपोची माहीती किंवा वेळापत्रक असेल तर ते नक्की आमच्या ई-मेल वर पाठवा , जेणेकरून त्याचा उपयोग आपले प्रवाशी करतील.

Leave a Comment