Panvel To Kalyan Bus Timetable
पनवेल वरून कल्याण ला जाण्यासाठी पनवेल बस स्टॅन्ड वरून एकूण सात साध्या बसेस जातात ह्या कल्याण मार्गे त्यांच्या डेपो कडे जातात. या बसेस वेगवेळ्या पाच डेपोकडे जाणाऱ्या महामंडळाच्या बसेस आहेत.
सर्वात पहिली बस हि सकाळी ०५:०० वाजता पनवेल वरून कल्याण कडे जाण्यासाठी निघते आणि सर्वात शेवटची बस हि रात्री २०:०० वाजता पनवेल वरून निघते. पनवेल वरून धुळ्याला जाणारी पहिली बस हि सकाळी ०६:४५ ला पनवेल वरून निघते जी कल्याण मार्गे धुळ्याला जाते. आणि शेवटची बस पनवेल वरून कल्याण मार्गे धुळ्याला जाणारी हि रात्री २०:०० वाजता निघते . पनवेल वरून कल्याण ला जाणारी शेवटची बस हीच आहे.
एरंडोल ला जाणारी एक बस हि कल्याण वरून जाते जी पहाटे ०५:०० वाजता पनवेल बस स्थानकवरून सुटते. गारगोटीला जरी एक बस सुध्दा कल्याण मार्गे जाते जी ६:३० ला पनवेल बस स्टॅन्ड वरून निघते. पनवेल वरून शिर्डीला जाणाऱ्या दोन बसेस आहेत.
ज्या दोन्ही कल्याण मार्गे शिर्डीला जातात दोन्ही बसेस ह्या, सकाळी जातात पहिली बस ८:०० वाजता सुटते, आणि दुसरी बस हि त्याच्या एक तासानंतर सुटते जी साधारणपणे ९:०० ला सुटते. शिरपूरला जाणारी एक बस सुध्दा कल्याण मार्गे जाते जी सकाळी ७:१५ सव्वा सात ला पनवेल बस स्टॅन्ड वरून शिरपूरला कल्याणमार्गे जाण्यासाठी निघते.
Panvel To Kalyan Bus Timetable
| Erandol | 05:00 |
| Gargoti | 06:30 |
| Shirpur | 07:15 |
| Dhule | 06:45 20:00 |
| Shirdi | 08:00 09:00 |
इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार वरील पोस्ट आम्ही लिहिली आहे. तरी या पोस्ट मध्ये काही चुका असतील तर त्या आम्हाला कंमेंट्स मध्ये नक्की सांगा . आणि जर पनवेल ते कल्याण या रूट च्या बसेस बद्दल तुम्हाला काही जास्तीची माहिती असेल तर ती हि सांगा जेणेकरून महामंडळाच्या प्रवाश्याना प्रॉब्लेम येणार नाही.
जर तुमच्याकडे पनवेल किंवा कल्याण डेपोचे वेळापत्रक असेल तर नक्कीच ते तुम्ही आमच्या ई-मेल वर पाठवू शकता.