Pune To Akkalkot ST Bus Timetable
अक्कलकोट ला पुण्यावरून जायचे असेल तर तुम्हाला स्वारगेट बस स्टॅन्ड ला जायला हवे . याचे मुख्य कारण म्हणजे बसेस ची संख्या. पुण्यातून अक्कलकोटच्या दिशेने दिवसभरात जाणाऱ्या बसेस ची संख्या हि २४ इतकी आहे . पण त्यातील एकाच बस शिवाजीनगर वाकडेवाडी बस डेपो मधून जाते बाकी सर्व बसेस ह्या स्वारगेट च्या बस स्टॅन्ड वरून सुटतात.
शिवाजीनगर वरून जाणारी गाडी हि सकाळी ९:०० वाजता डेपोतून सुटते. बाकीच्या सर्व अक्कलकोट ला जाणाऱ्या बसेस या स्वारगेट वरून सुटतात , सर्वात पहिली स्वारगेट वरून सुटणारी बस हि पहाटे पाच ला सुटते .आणि सर्वात शेवटची गाडी हि रात्रीच्या बारा वाजता स्वारगेट वरून अक्कलकोटला निघते.
स्वारगेट वरून अक्कलकोटला जाण्यासाठी तीन डेपोच्या बसेस असतात. एकोणवीस बसेस ह्या स्वारगेट ते अक्कलकोट अशा डायरेक्ट असतात. तीन बसेस ह्या स्वारगेट ते गाणगापूर आहेत ज्या अक्कलकोट मार्गे जातात आणि दोन बसेस ह्या अक्कलकोट मार्गे गुलबर्ग्याला जातात.
स्वारगेट ते गुलबर्गा जाणाऱ्या गाड्या ह्या सकाळीच जातात एक ९:०० वाजता तर दुसरी एक तासाने १०:०० वाजता इंदापूर, सोलापूर, अक्कलकोट मार्गे गुलबर्ग्याला जाते.
अक्कलकोटमार्गे गाणगापूर जाणाऱ्या तीन गाड्या आहेत . दोन सकाळी ८:३० वाजता आणि दुसरी ९:१५ वाजता स्वारगेट वरून निघतात. आणि शेवटची बस हि रात्री १८:४५ ला डेपोतून निघते.
इंदापूर मोहोळ सोलापूर मार्गे अक्कलकोट ला जाणारी १९ गाड्या स्वारगेट वरून निघतात. पहिली पहाटे पाच वाजता निघते आणि शेवटची गाडी हि रात्री बारा वाजता निघते . अर्ध्या पाऊण तासाला गाडी स्वारगेट वरून अक्कलकोटला निघते.
Pune To Akkalkot ST Bus Timetable
Swargate to Gangapur | 08:30 09:15 18:45 |
Swargate to Gulbarga | 09:00 10:00 |
Swargate to Akkalkot | 05:00 06:00 07:00 08:00 08:30 09:00 09:45 10:00 11:00 12:00 13:00 14:00 15:00 16:00 18:00 21:00 22:00 23:00 00:00 |
इंटरनेटवर पुण्यावरून अक्कलकोटला जाणाऱ्या बसेसची जितकी माहिती उपलब्ध होती ती आम्ही या पोस्ट मध्ये तुम्हाला सांगितली आहे . जर या पोस्ट मध्ये काही चूक असेल किंवा कोणती गोष्ट आम्ही सुधारू शकतो ते तुम्ही आम्हाला सांगू शकता. जर तुमच्याकडे स्वारगेट किंवा अक्कलकोट बस स्टँड्स ची काही माहिती असेल तर तुम्ही ती माहिती आम्हाला कंमेंट मध्ये किंवा इमेलद्वारे पाठवू शकता.