Shivajinagar To Latur Bus Timetable
शिवाजीनगर वाकडेवाडी ते लातूर हा प्रवास साधारण तीनशे साडे तीनशे किलोमीटरचा हा जो सात आठ तासात महामंडळाच्या बसेस ने complete होतो . पुण्यातून लातूर ला जाण्यासाठी तिन्ही बस स्टँड्स मधून बसेस जातात . पण आपण या पोस्ट मध्ये शिवाजीनगर मधून लातूर ला जाण्यासाठी किती बसेस आहेत , त्यांची वाकडेवाडी शिवाजीनगर डेपोतून निघण्याची वेळ काय आहे हे सांगणार आहोत.
शिवाजी नगर ते लातूर जाण्या साठी शिवाजीनगर बस स्टॅन्ड वरून एकूण दहा बसेस जातात. त्यातील दोन बसेस या हिरकणीच्या आहेत , तीन बसेस या शिवशाही च्या आहेत , आणि राहिलेल्या पाच बसेस ह्या साध्या महामंडळाच्या बसेस आहेत. लातूर ला जाण्या साठी पहिली गाडी हि सकाळी ०५:३० वाजता शिवाजीनगर बस स्टॅन्ड वरून निघते. आणि सर्वात शेवटची बस हि शिवशाहीचे जाते जी रात्री २३:३० ला शिवाजीनगर पुण्यातून लातूरला जाण्यासाठी निघते.
हिरकणीच्या ज्या दोन बसेस लातूरला जातात त्यातील पहिली बस हि दुपारी १४:३० ला सुटते आणि दुसरी बस हि संध्याकाळी १८:०० शिवाजीनगर वरून लातूरला जाण्यासाठी निघते. लातूरला जाण्यासाठी शिवाजीनगर वरून तीन शिवशाहीच्या ज्या बसेस जातात त्यातील पहिली बस हि सकाळी पहाटे ०५:३० ला सुटते त्यानंतर १२:३० ला दुसरी बस सुटते , तिसरी आणि शेवटची बस हि रात्री २३:३० ला सुटते.
लातूरला जाणाऱ्या ज्या पाच साध्या बसेस आहेत त्यातील पहिली बस हि सकाळी ०८:०० ला लातूर साठी रवाना होते दुसरी बस १०:३० ला निघते , तिसरी बस हि १२:०० ला सुटते , चौथी दुपारी १५:४५ ला निघते , पाचवी आणि शेवटची बस हि रात्री २१:०० वाजता सुटते.
Shivajinagar To Latur Bus Timetable
Shivajinagar to Latur (Hirkani) | 14:30 18:00 |
Shivajinagar to Latur (Shivshahi) | 05:30 12:30 23:30 |
Shivajinagar to Latur (LalPari) | 08:00 10:30 12:00 21:00 |
वरील सर्व माहिती इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहितीचे एकत्रीकरण करून लिहिली आहे , पोस्ट मध्ये काही चुका असतील तर त्या कंमेंट्स मध्ये तुम्ही आम्हाला सांगू शकता, जर तुमच्याकडे पुणे लातूर किंवा इतर कोणत्याही बस डेपोची माहिती किंवा वेळापत्रक असेल तर नक्कीच आम्हाला ई-मेल द्वारे पाठवू शकता किंवा कॉन्टॅक्ट फॉर्म भरू शकता.