Swargate To Mahad ST Bus Timetable
स्वारगेट वरून महाडला जाणारी खूप बसेस आहेत ,महाडला जाणाऱ्या एकूण एकोणचाळीस बसेस आहेत. ज्या दापोली , खेड व महाड डेपोला जाणाऱ्या आहेत. चोवीस बसेस या डायरेक्ट महाड डेपोत जातात. पाच बसेस या दापोली डेपोत जाणाऱ्या आहेत ज्या महाड मार्गे दापोलीला जातात. दहा बसेस या महाड मार्गे खेडला जातात.
स्वारगेट वरून महाडला जाणारी पहिली बस हि पहाटे ०५:३० ला सुटते आणि सर्वात शेवटची बस महाडला जाणारी ००:०० ला रात्रीच्या बारा वाजता स्वारगेट डेपोमधून सुटते. दापोलीला महाड मार्गे जाणाऱ्या पाच बसेस आहेत पहिली बस सकाळी ७:०० ला सुटते, आणि शेवटची बस हि रात्री ०९:०० वाजता सुटते. या दोन बसेस च्या दरम्यान तीन बसेस सुटतात ज्या ०७:४५ १३:१५ १३:३० ला स्वारगेट वरून दापोलीला जाण्यासाठी निघतात.
खेडला जाणाऱ्या दहा बसेस आहे ज्या महाड मार्गे खेडला जातात , स्वारगेट वरून खेडला जाणारी पहिली बस हि पहाटे ६:३० ला सुटते आणि शेवटची बस हि रात्री २३:३० ला सुटते. या दरम्यान एकूण आठ बसेस खेडसाठी निघतात ज्यांची वेळ ०७:४५ ०८:३० ०९:५० १२:०० १५:३० १७:१५ २१:३० २२:३० हि आहे.
स्वारगेट वरून महाडला जाणाऱ्या बसेस ची संख्या हि चोवीस इतकी आहे . स्वारगेट वरून महाडला जाणाऱ्या सर्व बसेस या माणगाव मार्गे जातात . सर्वात पहिली बस महाड ला जाण्यासाठी पहाटे ०५:३० ला स्वारगेट बस स्टॅन्ड वरून सुटते. आणि सर्वात शेवटची बस हि रात्री बारा वाजता स्वारगेट बस स्टॅन्ड वरून सुटते.
Swargate To Mahad ST Bus Timetable
Swargate To Dapoli (Via Mahad) | 07:00 07:45 13:15 13:30 21:00 |
Swargate to Khed (Via Mahad) | 06:30 07:45 08:30 09:50 12:00 15:30 17:15 21:30 22:30 23:30 |
Swargate to Mahad (Via Mahad) | 05:30 06:00 06:30 07:00 07:30 07:45 08:00 09:00 09:45 10:15 11:00 11:30 12:00 13:00 13:00 14:15 15:15 16:30 17:15 21:00 21:30 22:00 23:30 00:00 |
या पोस्ट मध्ये लिहिलेली सर्व माहिती हि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीचे एकत्रीकरण आहे , जर या पोस्ट मध्ये काही चुकीची माहिती असेल तर तुम्ही ती कंमेंट्स मध्ये सांगू शकता , आम्ही ती माहिती दुरुस्त करू. जर तुमच्याकडे पुणे , खेड , दापोली, महाड किंवा कोणत्याही बस स्टॅन्डचे वेळापत्रक किंवा माहिती असेल तर ती आमच्या ई-मेल वर नक्की पाठवा , जेणेकरून त्याचा उपयोग प्रवाशांना होईल.